Fans Fight at IND vs AFG Match: भारत - अफगाणिस्तान सामन्यात चाहत्यांमध्ये तुफान हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)
तेथे उपस्थित अनेक लोक वाद मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र भांडण करणाऱ्या लोकांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. मात्र, त्यांच्यात हा वाद कशामुळे झाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
विश्वचषक (ICC Cricket World Cup 2023) चा नववा सामना बुधवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये भारतीय संघाने 8 गडी राखून विजय मिळवला. त्याचवेळी, सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये स्टँडवर बसलेल्या चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी होताना दिसत आहे. हे प्रकरण केवळ वादापुरते मर्यादित नसून काही लोक एकमेकांना मारताना दिसत आहेत. यावेळी तेथे उपस्थित अनेक लोक वाद मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, मात्र भांडण करणाऱ्या लोकांवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. मात्र, त्यांच्यात हा वाद कशामुळे झाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)