IND vs NZ 3rd T20 Live Update: अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला फलंदांजी करण्याचा निर्णय, पहा दोन्ही संघाची प्लेइंग ईलेव्हन

टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.

IND vs NZ (Photo Credit - Twitter)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. दुसरा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. भारतीय संघ हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टी-20 मालिकेत उतरली आहे. दरम्यान, भारताने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11

भारत: शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड: फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, ब्लेअर टिकनर.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now