Gujarat Beat Mumbai: रोमांचक सामन्यात गुजरातचा विजय, गिलच्या नेतृत्वाखालील संघाने मुंबईचा सहा धावांनी केला पराभव
आयपीएल 2024 चा (IPL 2024) पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात गुजरातने सहा धावांनी विजय मिळवला आहे.
GT vs MI, IPL 2024 5th Match: आयपीएल 2024 चा (IPL 2024) पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात गुजरातने मुंबईचा सहा धावांनी पराभव केला. तत्तपुर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना गुजरातने मुंबईसमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 45 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 162 धावा करता आल्या. मुंबई इंडियन्ससाठी स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने सर्वाधिक 46 धावांची खेळी खेळली. गुजरात टायटन्सकडून उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, अजमतुल्ला ओमरझाई आणि मोहित शर्मा यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.
Match 5. Gujarat Titans Won by 6 Run(s) https://t.co/oPSjdbb1YT #TATAIPL #IPL2024 #GTvMI
— IndianPremierLeague (@IPL) March 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 24, 2024 11:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

