IND W vs AUS W, 18th Match Live Toss Update: भारत-ऑस्ट्रेलिया हायव्होलटेज सामन्यात नाणेफेकीचा कौल कांगारुच्या बाजूने, फलंदाजीचा घेतला निर्णय
टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
India Women's National Cricket Team vs Australia Women's National Cricket Team 18th Match: 2024 आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा 18 वा सामना (2024 ICC Women’s T20 World Cup) आज भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) खेळवला जात आहे. ताहलिया मॅकग्रा या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली आहे. आजचा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): बेथ मूनी (विकेटकीपर), ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफील्ड, ताहलिया मॅकग्रा (कर्णधार), जॉर्जिया वेरेहॅम, ॲनाबेल सदरलँड, सोफी मोलिनक्स, मेगन शुट, डार्सी ब्राउन
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर (क), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (डब्ल्यू), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)