Andrew Symonds's Last Post: अजब खेळ नियतीचा! शेन वॉर्नचे शेवटचे ट्विट रॉड मर्शवर, तर सायमंड याचे शेन वॉर्न याच्या नावे; पाहा Post
ऑस्ट्रेलियन क्रिकेटने 2 महिन्यांच्या कालावधीत आपले 3 सर्वात मोठे नायक गमावले आहेत. शेन वॉर्न आणि रॉड मार्श यांचे मार्चमध्ये निधन झाले असताना, शनिवारी, 14 मे रोजी अँड्र्यू सायमंड्सच्या निधनाच्या बातमीने क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट शेन वॉर्नच्या निधनाच्या (Shane Warne Death) धक्क्यातून सावरण्याआधीच, अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सचा (Andrew Symonds) शनिवारी, 14 मे रोजी एका कार अपघातात 46 व्या वर्षी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. दोन महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या आधुनिक काळातील दोन महान खेळाडूंचे निधन झाले. रॉड मार्श (Rod Marsh) यांचे मार्चमध्ये आजारपणामुळे वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. या तिघांमधील योगायोग म्हणजे सायमंड्सची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट त्याच्या माजी सहकारी वॉर्नबद्दल होती. तर वॉर्नने देखील अंतिम पोस्ट मार्श यांच्यासाठी लिहिले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)