Southampton हवामानाचं वृत्त Memes मधून देत Wasim Jaffer यांनी संयुक्त विजेतेपदाबाबत दिला एका गाण्याचा संदर्भ, पाहा Tweet

त्यामुळे दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने मजेशीर मिम सोशल मीडियावर शेअर केलं हवामानाचं वृत्त देत संयुक्त विजेतेपदाबाबत एका गाण्याचा संदर्भ दिला आहे.

वसीम जाफर (Photo Credits: Instagram)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना जवळपास पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) मजेशीर मिम्स सोशल मीडियावर शेअर केलं हवामानाचं वृत्त देत संयुक्त विजेतेपदाबाबत एका गाण्याचा संदर्भ दिला आहे. जाफरने बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र दरम्यान चित्रित झालेल्या ‘बांट लेंगे हम आधा-आधा’ या गाण्याचा संदर्भ दिला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)