ICC Women's World Cup 2022: इंग्लंडसमोर पाकिस्तानने पत्करली ‘शरणागती’, गतविजेत्या ब्रिटिश संघाची टॉप-4 मध्ये झेप; भारताचं मोठं नुकसान

ICC Women's World Cup 2022: महिला विश्वचषकाच्या 24व्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 9 गडी राखून पराभवाची धूळ चारली. क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानी संघ 41.3 षटकांत अवघ्या 105 धावांत गारद झाला, प्रत्युत्तरात इंग्लंडने 19.2 षटकांत लक्ष्य गाठले. यासह गतविजेता इंग्लंड पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचली असून टीम इंडियाला पाचव्या क्रमांकावर घसरली आहे

डॅनी व्याट (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

ICC Women's World Cup 2022: महिला विश्वचषकाच्या (Women's World Cup) 24व्या सामन्यात इंग्लंडने (England) पाकिस्तानचा (Pakistan) एकतर्फी 9 गडी राखून पराभवाची धूळ चारली. क्राइस्टचर्चमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानी संघ 41.3 षटकांत अवघ्या 105 धावांत गारद झाला, प्रत्युत्तरात इंग्लंडने 19.2 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य गाठले. इंग्लंडची सलामीवीर डॅनिएल व्याट (Danielle Wyatt) हिने 68 चेंडूंत 11 चौकारांसह नाबाद 76 धावा करून संघाचा मोठा विजय निश्चित केला. पाकिस्तानवर मोठ्या विजयासह गतविजेता इंग्लंड पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचली असून त्यांनी आता नेट रनरेटच्या आधारे टीम इंडियाला (Team India) पाचव्या क्रमांकावर ढकललं.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement