IPL Auction 2025 Live

ICC Women's World Cup 2022: भारताला मोठा दिलासा; स्मृती मंधाना हिला खेळण्यासाठी मिळाला ग्रीन-सिग्नल, सराव सामन्यात डोक्याला लागला होता खतरनाक बाउन्सर

यापूर्वी भारतीय संघासाठी मोठा दिलासादायक बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे सलामीवीर स्मृती मंधानाला दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध पहिल्या सराव सामन्यादरम्यान डोक्याला मार लागल्याने महिला वर्ल्ड कप स्पर्धा खेळणे सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.

स्मृती मंधाना (Photo Credit: Instagram)

ICC Women's World Cup 2022: भारताची (India) स्टार सलामी फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिला रविवारी दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाविरुद्ध सराव सामन्यात डोक्याला मार लागल्यावर न्यूझीलंड येथे आयसीसी महिला विश्वचषक (Women's World Cup) स्पर्धेत खेळणे सुरु ठेवण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पहिल्या सराव सामन्यात आफ्रिकेच्या शबनीम इस्माईलच्या बाउन्सरने डोक्याला फटका बसल्याने मंधाना रिटायर्ड हर्ट होऊन बाहेर परतली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)