ICC Women World Cup 2022 Points Table: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा टीम इंडियाला फायदा, जाणून घ्या पॉइंट्स टेबलची स्थिती
ICC Women's World Cup: दक्षिण आफ्रिकेने महिला विश्वचषक 2022 च्या 16 व्या सामन्यात यजमान न्यूझीलंडचा 2 गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा विजय आणि न्यूझीलंडच्या पराभवाचा टीम इंडियाला मोठा फायदा झाला आहे. चार सामन्यांत विजय मिळवून ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या क्रमांकावर आहे तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे कारण त्याचा नेट रनरेट ऑस्ट्रेलियापेक्षा कमी आहे.
ICC Women World Cup 2022 Points Table: महिला विश्वचषक (Women's World Cup) 2022 च्या 16 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) यजमान न्यूझीलंडचा (New Zealand) 2 गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेचा विजय आणि न्यूझीलंडच्या पराभवाचा टीम इंडियाला (Team India) मोठा फायदा झाला आहे. Proteas ने स्पर्धेत सलग चार सामने जिंकले, तर न्यूझीलंडने पाच सामन्यांपैकी तिसरा सामना गमावला आहे. आज न्यूझीलंडचा संघ जिंकला असता, तर भारतीय संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर घसरला असता पण असे घडले नाही भारतीय संघ अजूनही गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे.
Four wins in four games for South Africa 💪#CWC22 pic.twitter.com/d4KsZWaNqB
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 17, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2022 03:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

