ICC Men’s U19 World Cup 2024 Schedule Announced: आयसीसीकडून अंडर 19 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, गतविजेता भारताचा पहिला सामना होणार बांगलादेशसोबत

ही स्पर्धा 13 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान श्रीलंकेत होणार आहे. स्पर्धेच्या 15 व्या आवृत्तीत सोळा संघ सहभागी होतील, ज्यामध्ये स्वरूपातील काही उल्लेखनीय बदल करण्यात आले आहेत.

आयसीसी अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2024 (ICC U19 Men's Cricket World Cup 2024) चे सामने जाहीर झाले आहेत, ही स्पर्धा 13 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान श्रीलंकेत होणार आहे. स्पर्धेच्या 15 व्या आवृत्तीत सोळा संघ सहभागी होतील, ज्यामध्ये स्वरूपातील काही उल्लेखनीय बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंका तिसर्‍यांदा आणि 2006 नंतर प्रथमच असेल. यजमान 13 जानेवारी रोजी झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीने स्पर्धेचे उद्घाटन करतील. वेस्ट इंडिजमध्ये 2022 चे विजेतेपद जिंकणारे विद्यमान चॅम्पियन भारत दुसऱ्या दिवशी 2020 च्या चॅम्पियन बांगलादेशविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now