ICC Test Rankings: जो रूटची नंबर 1 च्या दिशेने आगेकूच, स्मिथ-विल्यमसनला ओव्हरटेक केले; बुमराह-आफ्रिदीची घसरण

न्यूझीलंडविरुद्धच्या लॉर्ड्स पहिल्या कसोटीत मॅच-विनिंग शतकाच्या जोरावर जो रूटने नंबर 1 सिंहासनाच्या दिशेने आगेकूच केली आणि आयसीसीचा सर्वोत्कृष्ट टेस्ट क्रिकेटपटूच्या ताज्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. तसेच कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीतही काही बदल आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि पाकिस्तानचा वेगवान शाहीन शाह आफ्रिदी प्रत्येकी एक स्थान खाली घसरले आहेत.

जो रूट (Photo Credit: Twitter/ICC)

ICC Test Rankings: ताज्या क्रमवारीत आयसीसीचा सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू जो रूटला (Joe Root) सर्वात मोठा फायदा झाला आणि इंग्लंडचा माजी कर्णधार दोन स्थानांनी पुढे जात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या लॉर्ड्स (Lords Test) येथील पहिल्या कसोटीत त्याच्या मॅच-विनिंग शतकाच्या जोरावर रूटने नंबर 1 सिंहासनाच्या दिशेने आगेकूच केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement