ICC T20I Bowling Rankings: आयसीसीने टी-20 क्रमवारी केली जाहीर, रवी बिश्नोई ठरला नंबर-1 गोलंदाज

रवी बिश्नोई आता जगातील नंबर 1 टी-20 गोलंदाज बनला आहे. त्याने राशिद खानला मागे सोडले. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला बिश्नोईने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, परंतु सततच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर बिश्नोईने चार उड्या मारल्या आणि अव्वल स्थान गाठले.

ICC T20I Bowling Rankings: आयसीसीने टी-20 क्रमवारी केली जाहीर, रवी बिश्नोई ठरला नंबर-1 गोलंदाज

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेत अप्रतिम कामगिरी करणारा भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला (Ravi Bishnoi) आयसीसीने (ICC) मोठे बक्षीस दिले आहे. रवी बिश्नोई आता जगातील नंबर 1 टी-20 गोलंदाज बनला आहे. त्याने राशिद खानला मागे सोडले. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला बिश्नोईने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, परंतु सततच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर बिश्नोईने चार उड्या मारल्या आणि अव्वल स्थान गाठले. यापूर्वी 23 वर्षीय बिश्नोई आयसीसी क्रमवारीत पाचव्या स्थानावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेतही बिश्नोईची कामगिरी उत्कृष्ट राहिली आणि त्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’चा किताब मिळाला. (हे देखील वाचा: IND vs SA T20 Head To Head: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका, जाणून घ्या कोण आहे वरचढ)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement