ICC U19 World Cup: आयसीसीकडून अंडर-19 विश्वचषक स्पर्धेसाठी यजमानांची नावे जाहीर, जाणून घ्या कुठे होणार स्पर्धा
पुढील हंगामात म्हणजेच 2024 मध्ये श्रीलंकेचे यजमानपद असेल, तर 2026 मध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करतील.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आगामी अंडर-19 विश्वचषक स्पर्धेसाठी (ICC U19 World Cup) यजमानांची नावे जाहीर केली आहेत. आयसीसीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, पुढील हंगामात म्हणजेच 2024 मध्ये श्रीलंकेचे (Sri Lanka) यजमानपद असेल, तर 2026 मध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया संयुक्तपणे या स्पर्धेचे आयोजन करतील. आयसीसीने मलेशिया, थायलंड तसेच नेपाळ आणि बांगलादेशला 2024 ते 2027 या कालावधीत स्वतंत्र अंडर-19 स्पर्धांसाठी होस्टिंगचे अधिकार दिले आहेत. मलेशिया आणि थायलंडला 2025 मधील अंडर-19 महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद बहाल करण्यात आले आहे. तर बांगलादेश आणि नेपाळला 2027 च्या स्पर्धेचे यजमान म्हणून नाव देण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)