Team India Head Coach Update: राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहणार का? आपल्या कराराबाबत केले मोठे विधान (Watch Video)

30 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Agit Agarkar) आणि राहुल द्रविड यांच्यात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक झाली. यामध्ये आगामी मालिकेसाठी संघाची निवड करण्यात आली. तसेच राहुल द्रविडने आपल्या वक्तव्याने नवा ट्विस्ट आणला आहे.

Rahul Dravid (Photo Credit - Twitter)

Team India Head Coach: भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या कराराच्या मुदतवाढीशी संबंधित माहिती बुधवारी बीसीसीआयने (BCCI) शेअर केली. आता याबाबतचे नवीन अपडेट गुरुवारी समोर आले आहे. 30 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Agit Agarkar) आणि राहुल द्रविड यांच्यात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक झाली. यामध्ये आगामी मालिकेसाठी संघाची निवड करण्यात आली. तसेच राहुल द्रविडने आपल्या वक्तव्याने नवा ट्विस्ट आणला आहे. या बैठकीनंतर राहुल द्रविडने बीसीसीआयकडून पुन्हा मुख्य प्रशिक्षक बनवण्याच्या करारावर अद्याप स्वाक्षरी केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी दिलेल्या वृत्ताचा हवाला देत एक निवेदन दिले की, 'मी अद्याप कोणत्याही गोष्टीवर स्वाक्षरी केलेली नाही. बीसीसीआयकडून अद्याप कागदपत्रे आलेली नाहीत. मंडळाला ते अधिकृत करावे लागेल. (हे देखील वाचा: IND vs AUS 4th T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात सर्वांच्या नजरा या दिग्गज खेळाडूंवर, आपल्या कामगिरीने करु शकतात कहर)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now