SRH Qualify For IPL 2024 Final: हैदराबादने राजस्थानचा 36 धावांनी केला पराभव, फायनलमध्ये घेतली धडक, आता केकेआरसोबत होणार अंतिम लढत

या सामन्यात हैदराबादने राजस्थानचा 36 धावांनी पराभव करत आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये धडक घेतली आहे. जिथे त्यांचा सामना कोलकातासोबत होणार आहे.

SRH

SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2: आयपीएल 2024 (IPL 2024) क्वालिफायर-2 चा सामना शुक्रवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने राजस्थानचा 36 धावांनी पराभव करत आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये धडक घेतली आहे. जिथे त्यांचा सामना कोलकातासोबत होणार आहे. तत्तपुर्वी, राजस्थानने नाणेफेक जिंकुन गोलंदांजी निवडली आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या हैदराबादने राजस्थानसमोर 176 धावांचे लक्ष्य ठेवले. हैदराबादसाठी स्टार फलंदाज हेनरिक क्लासेनने सर्वाधिक 50 धावांची खेळी खेळली. राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि आवेश खान यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकांत सात गडी गमावून केवळ 139 धावा करता आल्या. राजस्थान रॉयल्ससाठी स्टार फलंदाज ध्रुव जुरेलने सर्वाधिक नाबाद 56 धावांची खेळी खेळली. सनरायझर्स हैदराबादकडून शाहबाज अहमदने सर्वाधिक तीन बळी घेतले. आता रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)