Steve Smith Wicket: स्टीव्ह स्मिथच्या विकेटवर प्रचंड गदारोळ, फलंदाज आणि मैदानावरील पंचानाही DRSवर बसला नाही विश्वास
ऑस्ट्रेलियाच्या डावात 10व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर असे काही घडले ज्याने केवळ कांगारू फलंदाज स्टीव्ह स्मिथच (Steve Smith) नाही तर मैदानावरील पंच जोएल विल्सनलाही आश्चर्याचा धक्का बसला.
विश्वचषक 2023 चा दहावा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (SA vs AFG) यांच्यात लखनौ येथे खेळला जात आहे. सध्या या सामन्यात निकराची लढत अपेक्षित होती. दक्षिण आफ्रिकेनेही तेच केले. मात्र ऑस्ट्रेलियन संघाने फलंदाजीला सुरुवात केल्याने सामना एकतर्फी जाऊ लागला. ऑस्ट्रेलियाच्या डावात 10व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर असे काही घडले ज्याने केवळ कांगारू फलंदाज स्टीव्ह स्मिथच (Steve Smith) नाही तर मैदानावरील पंच जोएल विल्सनलाही आश्चर्याचा धक्का बसला. वास्तविक हा निर्णय डीआरएसनंतर आला आणि थर्ड अंपायरने स्मिथला बाद घोषित केले. असे काहीसे झाले की 10व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कागिसो रबाडाचा चेंडू स्टीव्ह स्मिथच्या पॅडवर लागला. पण चेंडू लेगस्टंपच्या बाहेर जाताना स्पष्ट दिसत होता. त्यामुळे फील्ड अंपायर जोएल विल्सन यांनी त्याला आऊट दिले नाही. पण यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक खात्रीने दिसला आणि कर्णधार टेंबा बावुमाने डीआरएस घेतला. त्यानंतर खरा वाद सुरू झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)