Hardik Pandya Out or Not Out: 'तो कसा आऊट झाला?', हार्दिक पांड्याची पत्नी नताशा अंपायरच्या चुकीवर भडकली
या सामन्यात भारतीय डावाच्या 40व्या षटकात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) क्रीजवर असताना मैदानावर गोंधळ उडाला होता.
IND vs NZ 1st ODI: टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर बुधवारी युवा सलामीवीर शुभमन गिलने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. या सामन्यात भारतीय डावाच्या 40व्या षटकात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) क्रीजवर असताना मैदानावर गोंधळ उडाला होता. या षटकात डॅरिल मिशेलने गोलंदाजी केली. त्याच्या षटकातील चौथा चेंडू ऑफ स्टंपच्या आत आला. स्टंपच्या अगदी चेंडू जवळून गेला पण थर्ड अंपायरने त्याला आउट दिले. पंचांच्या या निर्णयावर चाहत्यांसह क्रिकेटपंडितांनीही टीका केली. त्याचवेळी पांड्याही त्याच्याविरुद्धच्या आऊटच्या निर्णयामुळे संतापलेला दिसत होता. हे एवढ्यावरच संपले नाही, पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकने (Nataša Stanković) इंस्टाग्रामवर जाऊन तिच्या स्टोरीमध्ये नाराजी व्यक्त केली. तिने लिहिले की, "बॅटला चेंडू लागला नाही, बोल्ड ही झाला नाही, मग तो आऊट कसा झाला?" नताशाची ही पोस्ट पाहताच सोशल मीडियावर व्हायरल झाली.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)