IND vs AUS 1st T20: टीम इंडियाने 208 धावा करूनही ऑस्ट्रेलियाने भारताला कसे हरवले याचे अचूक विश्लेषण हर्षा भोगले यांनी केले

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 200 हून अधिक धावा केल्या, परंतु तरीही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

हर्षा भोगले (Photo Credits: Getty Images)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 200 हून अधिक धावा केल्या, परंतु तरीही रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव झाला असून या मालिकेत संघ 0-1 ने पिछाडीवर आहे. दरम्यान या सामन्यावर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी अचूक विश्लेषण केले आहे. ते म्हणाले, भारताच्या डेथ ओव्हर्सच्या गोलंदाजीच्या समस्या पुन्हा अधोरेखित झाल्या. मला शंका आहे की रोहित शर्मा खूप लवकर गोलंदाज शोधत होता. एकटा बुमराह ही पोकळी भरू शकत नाही.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement