IND-W vs UAE-W, Asia Cup 2024 Live Score Update: हरमनप्रीत कौरचे अर्धशतक, ऋचा घोषची वादळी खेळी; भारताने यूएईसमोर ठेवले 202 धावांचे लक्ष्य

यूएईची कर्णधार ईशा रोहित ओझाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 201 धावा केल्या.

Photo Credit - X

Asia Cup 2024: महिला आशिया कप 2024 सुरु झाला आहे. आशिया चषक स्पर्धेतील पाचवा सामना भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि संयुक्त अरब अमिराती राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला हरवून विजयाने सुरुवात केली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाचा निव्वळ धावगती सध्या +2.294 आहे आणि संघाचे 2 गुण आहेत. दरम्यान, यूएईची कर्णधार ईशा रोहित ओझाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 201 धावा केल्या. टीम इंडियासाठी स्टार फलंदाज हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 66 धावांची खेळी खेळली. यूएई कडून कवीश आगाडेने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी युएई संघाला 20 षटकात 202 धावा करायच्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now