Hardik Pandya No Look Shot Video Viral: हार्दिकचा स्वॅगच भारी; नो लुक शॉटने चाहत्यांना लावलयं वेड, व्हिडिओ पहाच (Watch Video)

त्याच्या नो लुक शॉटने चाहत्यांना अक्षरश: वेड लावलयं.

Photo Credit- X

Hardik Pandya No Look Shot Video Viral: भारताचा अव्वल अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) रविवारी 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरमध्ये बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात बॉलींगसह बॅटींगमध्ये चमकदार कामगिरी केली. विराट कोहलीचा विक्रम मोडला. तस्किन अहमदच्या चेंडूवर चौकार मारण्याचा त्याचा 'नो-लूक' शॉट(Hardik Pandya No Look Shot) व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे. पहिल्या टी 20 मध्ये हार्दिक पांड्याने 16 चेंडूत 39 धावा केल्या आणि नाबाद राहिला. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि दोन षटकार मारले. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 7 विकेटने पराभव केला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतही 1 0 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाचा 19.5 षटकांत सर्वबाद 127 धावा झाल्या. प्रत्युत्तरात भारताने 11.5 षटकांत लक्ष्य गाठले. (हेही वाचा: Hardik Pandya: हार्दिकने मोडला विराटचा ‘हा’ खास विक्रम; बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केली कामगिरी)

तस्किन अहमदच्या चेंडूवर हार्दिक पांड्याचा 'नो लूक शॉट'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif