Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce: हार्दिक पांड्याने केली नतासा स्टॅनकोविचसोबत घटस्फोटाची घोषणा; म्हणाला- 'हा आमच्यासाठी अतिशय कठीण निर्णय होता'
हार्दिक आणि नतासा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या. आता त्यावर पडदा पडला आहे.
Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce: अखेर हार्दिक पांड्या आणि नतासा स्टॅनकोविक वेगळे झाले आहेत. हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवर ही माहिती दिली आहे. हार्दिक आणि नतासा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या. आता त्यावर पडदा पडला आहे. हार्दिकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, ‘4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर नतासा आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही या नात्यासाठी खूप प्रयत्न केले आणि सर्वकाही दिले. मात्र आता आम्हाला असे वाटते की, आम्ही दोघांनी वेगळे होणे चांगले आहे. नतासा आणि माझ्यासाठी हा कठीण निर्णय होता. आम्ही एक कुटुंब म्हणून वाढण्याचा आनंद लुटला, एकमेकांचा आदर केला आणि एकमेकांना पाठिंबा दिला. अगस्त्य आमच्या दोघांच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. आंम्ही दोघेही एक पालक म्हणून त्याचा सांभाळ करू.’
हार्दिकने 1 मे 2020 रोजी नतासाशी लग्न केले. त्याच वर्षी, 30 जुलै 2020 रोजी त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म झाला. नतासा ही मुळची सर्बियाची असून, तिचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट 'सत्याग्रह' होता. याशिवाय ती 'बिग बॉस-8' आणि 'नच बलिए-9'मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. बादशाहच्या 'डीजे वाले बाबू' या गाण्याने तिला अधिक लोकप्रियता मिळाली. हार्दिक आणि नतासा एका नाईट क्लबमध्ये भेटले होते. येथूनच दोघांमधील प्रेमकहाणी सुरू झाली. (हेही वाचा: Richa Chadha and Ali Fazal Become Parents: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या घरी कन्यारत्न; सोशल मिडियाद्वारे दिली मुलीच्या जन्माची माहिती)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)