ICC Men’s T20I All-Rounder Rankings: हार्दिक पांड्या बनला जगातील नंबरवन टी-20 अष्टपैलू खेळाडू, विश्वचषकातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे मिळाले बक्षीस
हार्दिकने दोन स्थानांनी प्रगती करत श्रीलंकेचा स्टार खेळाडू वानिंदू हसरंगाची बरोबरी केली आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमधील चमकदार कामगिरीसाठी हार्दिकला बक्षीस मिळाले आहे.
ICC T20I Ranking: आयसीसीने टी-20 क्रमवारी जाहीर केली आहे. भारतीय टी-20 संघाचा उपकर्णधार आणि स्टार खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा जगातील नंबर वन अष्टपैलू खेळाडू बनला आहे. ताज्या क्रमवारीत तो श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगासोबत संयुक्त नंबर वन बनला आहे. हार्दिकने दोन स्थानांनी प्रगती करत श्रीलंकेचा स्टार खेळाडू वानिंदू हसरंगाची बरोबरी केली आहे. टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमधील चमकदार कामगिरीसाठी हार्दिकला बक्षीस मिळाले आहे. अंतिम फेरीत हार्दिकने हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्या महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. हार्दिकने या स्पर्धेत बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी केली होती आणि तो टी-20 मध्ये जगातील नंबर वन अष्टपैलू बनणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
Hardik Pandya rises to No.1 in the latest ICC Men's T20I All-rounder Rankings 🔝
How the Rankings look after #T20WorldCup 2024 ⬇️https://t.co/vbOk3XT7C3
— ICC (@ICC) July 3, 2024
Hardik Pandya becomes the new No.1 Ranked T20i All Rounder.
- The comeback of Hardik. 👊🇮🇳 pic.twitter.com/PuUsrQzsOi
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 03, 2024 04:11 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

