Hanuma Vihari Become Father: भारतीय क्रिकेटर हनुमा विहारी झाला बाबा; पत्नी प्रीती राजने दिला मुलाला जन्म
प्रीतीने ही आनंदाची बातमी सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. या जोडप्याने आपल्या मुलाचे नाव इवान किश ठेवले आहे.
भारतीय क्रिकेटर हनुमा विहारी आणि त्याची पत्नी प्रीती राज यांच्या घरातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हनुमा विहारीची पत्नी प्रीतीने मुलाला जन्म दिला आहे. प्रीतीने ही आनंदाची बातमी सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. या जोडप्याने आपल्या मुलाचे नाव इवान किश ठेवले आहे. इवानचा जन्म 7 जुलै रोजी झाला. विहारीने अलीकडेच दक्षिण विभागाचे नेतृत्व करून दिलीप ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. त्यांच्या संघाने अंतिम फेरीत पश्चिम विभागाचा 75 धावांनी पराभव केला. (हेही वाचा: Jasprit Bumrah Injury Update: जसप्रीत बुमराह फिटनेसबाबत मोठी अपडेट, व्हिडिओ शेअर करुन दिली माहिती)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)