RCB vs KKR Live Score Update: कोलकाता नाईट रायडर्सचा अर्धा संघ तबूंत, सिराजने आंद्रे रसेलला केले बाद
दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मागील सलग चार सामन्यांत पराभूत होत आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दोन सामने जिंकले आहेत.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमातील 36 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मागील सलग चार सामन्यांत पराभूत होत आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दोन सामने जिंकले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने या मोसमातील सातपैकी चार सामने जिंकले आहेत, तर कोलकाता नाईट रायडर्सने सात सामन्यांत फक्त दोन विजय मिळवले आहेत. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला चौथा मोठा धक्का बसला. व्यंकटेश अय्यर 31 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ 186/5 धावा.