ENG vs SL, ICC World Cup 2023 Live Score Update: लाहिरू कुमाराने श्रीलंकेला मिळवून दिले आठवे यश, बेन स्टोक्सला केले बाद
दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी चार सामने खेळले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे.
विश्वचषकाच्या 25व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात श्रीलंकेसमोर गतविजेत्या इंग्लंडचे (SL vs ENG) आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. या स्पर्धेत इंग्लंड आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी चार सामने खेळले आहेत. दोघांनाही प्रत्येकी एक विजय मिळाला आहे. दरम्यान, विश्वचषकात इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाला आठवा मोठा धक्का बसला आहे. बेन स्टोक्स 43 धावा करून लाहिरू कुमाराचा बळी ठरला. इंग्लंड संघाची धावसंख्या 137/8 आहे.
BEN STOKES GONE.....!!!!
ENGLAND 137 FOR 8 AT CHINNASWAMY. pic.twitter.com/WIT3JpSH36
— Johns. (@CricCrazyJohns) October 26, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2023 03:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

