IND vs PAK: हाफिजने पाकिस्तानच्या पराभवासाठी कर्णधार बाबर आझमला जबाबदार धरले; पहा काय म्हणाला तो

मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) मैदानावर विराट कोहलीच्या नाबाद 82 धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानने दिलेले 160 धावांचे लक्ष्य सहा गडी गमावून पूर्ण केले.

Mohammad Hafeez (Photo Credit - Twitter)

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजने (Mohammad Hafeez) टी-20 विश्वचषच 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत भारताच्या पराभवानंतर कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) फटकारले आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तान (IND vs PAK) विजय मिळवला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) मैदानावर विराट कोहलीच्या नाबाद 82 धावांच्या जोरावर भारताने पाकिस्तानने दिलेले 160 धावांचे लक्ष्य सहा गडी गमावून पूर्ण केले. अखेरच्या षटकात पाकिस्तानला 16 धावा बचावाव्या लागल्या, पण कर्णधार बाबरने फिरकीपटू मोहम्मद नवाजकडे चेंडू सोपवला. बाबरच्या या निर्णयावर आता हाफिजने प्रश्न उपस्थित केले आहेत. बाबर आता शिकला नाही तर कधी शिकणार, असे माजी अष्टपैलू खेळाडूने म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now