GT vs RR, IPL 2024 24th Match Toss Update: गुजरातने राजस्थानविरुद्ध नाणेफेक जिंकली, गोलंदाजी निवडली, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
या मोसमात राजस्थानने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत त्यांना आज विजयी मुसंडी मारायची आहे. तर गुजरात संघाने पाचपैकी केवळ दोनच सामने जिंकले असून तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
GT vs RR, IPL 2024 24th Match: आयपीएल 2024 च्या 24 व्या (IPL 2024) सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मोसमात राजस्थानने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत त्यांना आज विजयी मुसंडी मारायची आहे. तर गुजरात संघाने पाचपैकी केवळ दोनच सामने जिंकले असून तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, गुजरातने नाणेफेक जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, मोहित शर्मा
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल