IPL 2023, Match 13 GT vs KKR Live Score Update: गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर ठेवले 205 धावांचे मोठे लक्ष्य, विजय शंकर आणि साई सुदर्शन यांची धडाकेबाज खेळी

गुजरात टायटन्सकडून फलंदाजी करताना विजय शंकरने शानदार नाबाद 63 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नारायणने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकात 205 धावा करायच्या आहेत.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज दोन सामने होणार आहेत. सुपर संडेचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या मोसमात, जिथे गुजरात टायटन्सने त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये सहज विजय मिळवला आहे. त्याचवेळी कोलकाताला पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, कोलकाताने दुसरा सामना मोठ्या फरकाने जिंकला. दरम्यान, नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सचा कर्णधार राशिद खानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 204 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून फलंदाजी करताना विजय शंकरने शानदार नाबाद 63 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नारायणने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकात 205 धावा करायच्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement