Gujarat Titans Jersey Launch: हार्दिक पांड्या, BCCI सचिव जय शाह यांच्या उपस्थितीत अहमदाबाद फ्रँचायझीच्या जर्सीचे अनावर; या पेहरावात दिसणार गुजरातचे ‘भाईडा’

Gujarat Titans Jersey Launch: नवोदित फ्रेंचायझी गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 च्या मोहिमेपूर्वी त्यांची नवीन जर्सी लॉन्च केली. कर्णधार हार्दिक पांड्या, मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा यांच्यासह बीसीसीआयचे सचिव जय शाह या कार्यक्रमाला उपस्थित होते. गुजरात संघ वानखेडे स्टेडियमवर 28 मार्च रोजी सहनवोदित लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल.

गुजरात टायटन्स जर्सी आयपीएल 2022 (Photo Credit: Twitter)

Gujarat Titans Jersey Launch: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) 13 मार्च रोजी अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर अधिकृतपणे त्यांच्या नवीन जर्सीचे अनावरण केले. निळ्या रंगाच्या जर्सीची एक विशिष्ट आणि आकर्षक रचना आहे. गुजरातस्थित फ्रँचायझीने स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) त्यांचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now