Gujarat Beat Rajasthan: गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा नऊ गडी राखून केला पराभव, गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांनीही केली चांगली कामगिरी

दोन्ही संघांमधील हा सामना राजस्थान रॉयल्सचे होम ग्राऊंड असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्स संघाचा नऊ गडी राखून पराभव केला.

Gujarat Beat Rajasthan: गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा नऊ गडी राखून केला पराभव, गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांनीही केली चांगली कामगिरी
GT

इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामातील 48वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना राजस्थान रॉयल्सचे होम ग्राऊंड असलेल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्स संघाचा नऊ गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघाने निर्धारित 17.5 षटकात 118 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक 30 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून राशिद खानने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाने 13.5 षटकांत एक गडी गमावून लक्ष्य गाठले. गुजरात टायटन्सकडून सलामीवीर वृद्धीमान साहाने सर्वाधिक नाबाद 41 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक एक विकेट घेतली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 05, 2023 10:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).