IND vs SA 2nd Test Day 2 Live Scoe Update: केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची शानदार सुरुवात, बुमराहला मिळाली चौथी विकेट
दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या दिवसाच्या 62/3 या धावसंख्येपुढे खेळण्यासाठी दुसऱ्या डावात उतरला आहे. याआधी सामन्याच्या पहिल्या दिवशी आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांत गारद झाला होता. भारताकडून मोहम्मद सिराजने सहा विकेट घेतल्या. त्यानंतर भारत पहिल्याच दिवशी पहिल्या डावात 153 धावांवर ऑलआऊट झाला.
IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये (Cape Town) खेळवला जात आहे. आज (गुरुवार) सामन्याचा दुसरा दिवस आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या दिवसाच्या 62/3 या धावसंख्येपुढे खेळण्यासाठी दुसऱ्या डावात उतरला आहे. याआधी सामन्याच्या पहिल्या दिवशी आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांत गारद झाला होता. भारताकडून मोहम्मद सिराजने सहा विकेट घेतल्या. त्यानंतर भारत पहिल्याच दिवशी पहिल्या डावात 153 धावांवर ऑलआऊट झाला. दमदार सुरुवातीनंतर संघाची मोठी धावसंख्या हुकली. एकवेळ भारताच्या 153 धावांत 4 विकेट्स होत्या. मात्र लुंगी अँगिडीच्या चेंडूवर केएल राहुलने खराब शॉट खेळून आपली विकेट गमावली. त्यानंतर पुढच्या 11 चेंडूत कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडीने संपूर्ण संघ 153 धावांवर आटोपला. दरम्यान, केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची शानदार सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने चौथी विकेट गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 68/4