WTC 2023-25 Ranking: मोठी कामगिरी! वेस्ट इंडिजविरुद्धच्या मोठ्या विजयामुळे भारत पुढील कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत पोहोचला अव्वल स्थानावर
भारताने कॅरेबियन विरुद्धची पहिली कसोटी 141 धावांनी आणि एका डावाने जिंकली. या विजयात यशस्वीच्या 171 धावा आणि अश्विनच्या 12 विकेट्स महत्त्वाच्या ठरल्या. या विजयाने भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत 100% गुणांसह अग्रस्थानी नेले आहे.
IND vs WI 1st Test 2023: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे नवे चक्र सुरू झाले आहे. या 2023-25 चक्रातील भारताची पहिली मालिका वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. भारताने कॅरेबियन विरुद्धची पहिली कसोटी 141 धावांनी आणि एका डावाने जिंकली. या विजयात यशस्वीच्या 171 धावा आणि अश्विनच्या 12 विकेट्स महत्त्वाच्या ठरल्या. या विजयाने भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिप गुणतालिकेत 100% गुणांसह अग्रस्थानी नेले आहे. पुढील कसोटी 20 जुलैपासून सुरू होणार आहे. कसोटी चॅम्पियनशिपची पहिली मालिका ही ऑस्ट्रेलिया आणि इंग्लजमध्ये सुरु आहे. सध्याचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेता ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. तर आता ते 61.11 टक्के मिळवून दुसऱ्या स्थानावर आले आहे. त्यानंतर इंग्लंडने तिसरे स्थान पटकावले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)