Sandeep Lamichhane Rape Case: टी-20 विश्वचषकापूर्वी नेपाळ क्रिकेटसाठी आनंदाची बातमी, संदीप लामिछानेला बलात्कार प्रकरणात क्लीन चिट
आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 च्या आधी नेपाळ क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये 23 वर्षीय लेग-स्पिन गोलंदाज संदीप लामिछानेला बलात्कार प्रकरणात 8 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.
Sandeep Lamichhane Rape Case: आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 च्या आधी नेपाळ क्रिकेट संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या वर्षी जानेवारीमध्ये 23 वर्षीय लेग-स्पिन गोलंदाज संदीप लामिछानेला बलात्कार प्रकरणात 8 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आता न्यायालयाने संदीप लामिछाने यांना क्लीन चिट दिली आहे. आता संदीप लामिछाने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये नेपाळकडून खेळू शकणार आहे. नेपाळ क्रिकेट बोर्डाने 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघाची घोषणा आधीच केली असली तरी, संघांना 25 मे पर्यंत बदल करण्याची परवानगी आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)