Glenn Maxwell, Fastest ODI World Cup Century: ग्लेन मॅक्सवेलने रचला इतिहास, 40 चेंडूत ठोकले विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक
ग्लेन मॅक्सवेलने 44 चेंडूत 106 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 षटकार मारले. या धडाकेबाज खेळीने त्याने याच विश्वचषकात 49 चेंडूत शतक झळकावून विश्वचषकातील सर्वात जलद शतकाचा विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या एडन मार्करामला मागे टाकले.
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये पहिले दोन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने आता शानदार पुनरागमन केले आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर कांगारू संघाने नेदरलँड्सविरुद्ध (AUS vs NED) जोरदार आक्रमण केले. पहिले डेव्हिड वॉर्नरने (Glenn Maxwell) शतक झळकावले. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने केवळ शतकच केले नाही तर इतिहासही रचला. त्याने अवघ्या 40 चेंडूत शतक झळकावले आणि एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकले. एकूणच, हे एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चौथे जलद शतक ठरले. ग्लेन मॅक्सवेलने 44 चेंडूत 106 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 9 चौकार आणि 8 षटकार मारले. या धडाकेबाज खेळीने त्याने याच विश्वचषकात 49 चेंडूत शतक झळकावून विश्वचषकातील सर्वात जलद शतकाचा विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या एडन मार्करामला मागे टाकले. म्हणजेच या विश्वचषकात सर्वात वेगवान शतकाचा विक्रम दोनदा झाला आहे. या स्पर्धेत प्रथमच मॅक्सवेलची बॅट ऑस्ट्रेलियासाठी बोलकी झाली आहे. त्याच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 8 गडी गमावून 399 धावा केल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)