GG-W vs DC-W, WPL 2024 Live Inning Updates: दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सला दिले 164 धावांचे लक्ष्य, कर्णधार मेग लॅनिंगची अर्धशतकी खेळी
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत आठ गडी गमावून 163 धावा जोडल्या. गुजरातकडून मेघना सिंगने सर्वाधिक 4 बळी घेतले.
कर्णधार मेग लॅनिंगच्या अर्धशतकी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सला धावांचे लक्ष्य दिले आहे. ज्यामध्ये अनेक फलंदाजांनी छोट्या धावसंख्येमध्ये मदत केली आहे. 03 मार्च (रविवार), टाटा WPL 2024 आजचा सामना हा गुजरात विरुद्ध दिल्ली असा होत असून एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे सुरु आहे. गुजरात जायंट्सचा कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली संघात दोन बदल करण्यात आले असूनमारिझान कॅप आणि मेनू काढून टाकण्यात आले आहे. गुजरातने हरलीन देओल आणि स्नेह राणा या जखमी खेळाडूंना वगळले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकांत आठ गडी गमावून 163 धावा जोडल्या. गुजरातकडून मेघना सिंगने सर्वाधिक 4 बळी घेतले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)