Gautam Gambhir On Ram Mandir Inauguration: राम मंदिर उद्घाटनावर गौतम गंभीरला एका चाहत्यांनी विचारला प्रश्न, क्रिकेटपटूने काय दिले उत्तर पाहा...
श्रीरामाच्या दुमजली मंदिरामध्ये तळभागात गर्भगृहामध्ये रामलल्लांची मूर्ती स्थापन केली जाणार आहे तर पहिल्या मजल्यावर श्रीरामांचा दरबार असणार आहे.
Gautam Gambhir On Ram Mandir Inauguration: अयोद्धा नगरी सध्या श्री रामजन्मभूमी मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. श्रीरामाच्या दुमजली मंदिरामध्ये तळभागात गर्भगृहामध्ये रामलल्लांची मूर्ती स्थापन केली जाणार आहे तर पहिल्या मजल्यावर श्रीरामांचा दरबार असणार आहे. 22 जानेवारी 2024 दिवशी हा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरला एका चाहत्यांनी ट्वीटवर प्रश्न विचारला आहे की, शेकडो वर्षांनंतर अयोध्येत राम मंदिर बांधणार आहे. राम मंदिर बघायला जाणार का?? यावर गौतम गंभीर उत्तर देताना म्हणतो, की, 'नक्की जाणार. ही संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब आहे. मी सहभागी असलेल्या सर्वांचे अभिनंदन करतो आणि यासाठी माननीय पंतप्रधानांचे आभार मानतो.' (हे देखील वाचा: Ayodhya Ram Mandir: अयोद्धेच्या राम मंदिरात 'राम लल्लां'च्या रूपातील मूर्तीसाठी आज मतदान; मंदिर ट्रस्ट 3 मूर्त्यांमधून करणार निवड!)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)