Gary Ballance ने तत्काळ प्रभावाने सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती केली जाहीर
33 वर्षीय बॅलेन्सने 2014 ते 2017 दरम्यान इंग्लंडकडून 23 कसोटी सामन्यांमध्ये चार शतके झळकावली होती. काही काळापूर्वी त्याने झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये पुन्हा प्रवेश केला.
यॉर्कशायर आणि इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू गॅरी बॅलन्सने (Gary Ballance) निवृत्ती जाहीर केली आहे. बॅलेन्सने नुकतेच झिम्बाब्वेकडून पुन्हा कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने तत्काळ प्रभावाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 33 वर्षीय बॅलेन्सने 2014 ते 2017 दरम्यान इंग्लंडकडून 23 कसोटी सामन्यांमध्ये चार शतके झळकावली होती. काही काळापूर्वी त्याने झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये पुन्हा प्रवेश केला. बॅलेन्सने डिसेंबरमध्ये झिम्बाब्वे क्रिकेटसोबत दोन वर्षांचा करार केला होता. त्याने जानेवारी ते मार्च दरम्यान एकूण 8 सामने खेळले, ज्यामध्ये बुलावायो येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकमेव कसोटीसह त्याने नाबाद 137 धावा केल्या. 7 फेब्रुवारी रोजी, त्याने माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केपलर वेसेल्स यांच्यानंतर दोन वेगवेगळ्या देशांसाठी शतके झळकावून इतिहास रचला. मात्र, गेल्या महिन्यात नेदरलँड्सविरुद्धच्या वनडे मालिकेत नाबाद 64 धावा केल्यानंतर बॅलेन्सने आता पुन्हा सुरू केलेली कारकीर्द संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)