Rohit Sharma Share Pic With Youngsters: ‘गार्डन में घूमने वाले बंदे…,’ रोहित शर्माने इंग्लंडला हरवल्यानंतर एक खास फोटो केला शेअर

मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघातील तरुणांसोबतचा एक फोटो शेअर केला.

Rohit Sharma Share Pic With Youngsters: धर्मशाळा येथे भारताने पाहुण्यांचा एक डाव आणि 64 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-1 असा शानदार विजय नोंदवला. शुभमन गिल, ध्रुव जुरेल, सरफराज खान आणि यशस्वी जैस्वाल या भारतीय तरुणांच्या कामगिरीमुळे ही मालिका संस्मरणीय ठरली. मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने आपल्या संघातील तरुणांसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्याला 'गार्डन में घूमने वाले बंदे' असे कॅप्शन दिले. चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला. (हे देखील वाचा: MS Dhoni Practice Video: एमएस धोनी आयपीएलसाठी सज्ज, नेटमध्ये केली आक्रमक फलंदाजी (Watch Video)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)