IND vs NZ 1st ODI Live Score: न्यूझीलंड संघाचे चार फलंदाज परतले तंबूत, कुलदीप यादवला मिळाली दुसरी विकेट

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 8 गडी गमावून 349 धावा केल्या. टीम इंडियाकडून युवा सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 208 धावा केल्या.

कुलदीप यादव (Photo Credit: Twitter)

टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाला या सामन्यात विजयाने मालिका सुरू करायची आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 8 गडी गमावून 349 धावा केल्या. टीम इंडियाकडून युवा सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 208 धावा केल्या. न्यूझीलंडकडून हेन्री शिपले आणि डॅरिल मिशेल यांनी सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या. न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 350 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला चौथा मोठा झटका बसला आहे. कुलदीप यादवला या सामन्यात दुसरी विकेट मिळाली आहे. न्यूझीलंडचा स्कोर 78/3.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement