क्रिकेटपटू Irfan Pathan आणि पत्नी Safa यांना दुसरं ‘पुत्ररत्न’, फोटो शेअर करून चाहत्यांना दिली खुशखबर

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण आणि त्याची पत्नी सफा यांना मुलगा झाला आहे. इरफानने ट्विटरवर त्याचा फोटो शेअर करत बाळाचे नावही सांगितले. ही बातमी शेअर करताना इरफानने पुष्टी केली की बाळ आणि आई दोघेही निरोगी आहेत व त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. इरफानला इमरान खान पठाण नावाचा आणखी एक मुलगा असून त्याचा जन्म 20 डिसेंबर 2016 रोजी झाला.

क्रिकेटर इरफान पाठनला पुत्ररत्न (Photo Credit: Twitter)

भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि त्याची पत्नी सफा (Safa) यांना दुसरं पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. इरफानने ट्विटरवर त्याचा फोटो शेअर करत बाळाचे नावही सांगितले. सुलेमान खान (Suleiman Khan) असे या मुलाचे नाव असून ही बातमी शेअर करताना इरफानने पुष्टी केली की बाळ आणि आई दोघेही निरोगी आहेत आणि प्रकृती स्थिर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now