Ajinkya Rahane Half Century: फ्लावर समझा क्या, फायर है मैं…अजिंक्य रहाणेने उडवून दिली खळबळ, ठोकले वेगवान अर्धशतक (Watch Video)
रहाणेने चौकार आणि षटकार लगावत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची जोरदार मुसंडी मारली.
क्रिकेट खरोखरच मनोरंजक आहे. कोणता खेळाडू कधी काय चमत्कार करेल हे सांगता येत नाही. शनिवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या 12व्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्जकडून पदार्पण करणाऱ्या अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) मैदानावर बॅटने असा गोंधळ घातला की, वानखेडेवर बसलेल्या प्रेक्षक ही बघत राहिले. रहाणेने चौकार आणि षटकार लगावत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची जोरदार मुसंडी मारली. डेव्हॉन कॉनवे शून्यावर बाद झाल्यानंतर आलेल्या रहाणेने येताच स्फोटक फलंदाजी करत अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक झळकावले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)