IPL Auction 2025 Live

Fastest Ball in IPL 2022: वेगाचा बादशाह Umran Malik याचा कहर सुरूच, DC विरुद्ध फेकला IPL इतिहासातील दुसरा वेगवान चेंडू; पाहा कोण आहे नंबर 1

उमरानने दिल्लीविरुद्ध 154.8 नंतर 156 आणि 157 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आपलाच विक्रम मोडला आहे. 155 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याचे उमरानचे स्वप्न होते, जे आज त्याने पूर्ण झाले आहे.

उमरान मलिक (Photo Credit: PTI)

Fastest Ball in IPL 2022: सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज उमरान मलिकने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कहर केला आहे. मलिकने दिल्लीच्या डावातील 19.4 षटकात रोवमन पॉवेलला 157 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली, जो हंगामातील सर्वात वेगवान चेंडू ठरला. तसेच IPL इतिहासातील हा दुसरा वेगवान चेंडू ठरला आहे. आयपीएलमधील वेगवान चेंडूचा विक्रम शॉन टेटच्या नावावर आहे, ज्याने 2011 मध्ये 157.71 किमी प्रतितास वेगाने बॉल टाकला होता.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)