Rohit Sharma Viral Video: चाहत्याने रोहित शर्माला विचारले आयपीएलमध्ये कोणती टीम? कर्णधाराने दिले मजेशीर उत्तर, पाहा व्हिडिओ

पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा चिन्नास्वामी स्टेडियममधील एका प्रेक्षकाने रोहित शर्माला आगामी आयपीएल हंगामातील संघाबद्दल विचारले. ज्याला कर्णधार रोहित शर्माने मजेशीर उत्तर दिले आहे.

Rohit Sharma (Photo Credit - X)

IND vs NZ 1st Test 2024: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे. आज पहिल्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस आहे. भारतीय संघाने चौथ्या दिवशी न्यूझीलंडवर आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा चिन्नास्वामी स्टेडियममधील एका प्रेक्षकाने रोहित शर्माला आगामी आयपीएल हंगामातील संघाबद्दल विचारले. ज्याला कर्णधार रोहित शर्माने मजेशीर उत्तर दिले आहे. बंगळुरू कसोटीच्या चौथ्या दिवशी पावसाने दणका दिला. त्यामुळे बराच वेळ सामना थांबला होता. यावेळी रोहित प्रेक्षकांच्या जवळून जात असताना एका प्रेक्षकाने भारतीय कर्णधार रोहित भाईला विचारले, "आयपीएलमध्ये कोणती टीम? तेव्हा रोहित म्हणाला तु सांग... तेव्हा चाहता म्हणाला आरसीबीमध्ये या भाई", हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now