How To Watch WI vs NZ, 26th Match Live Streaming: वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यात होणार रोमांचक सामना, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह
या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर, वेस्ट इंडिजने त्यांचे पहिले 2 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंड संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
WI vs NZ T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 चा 26 वा सामना (T20 World Cup 2024) उद्या वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड (WI vs NZ) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधला हा सामना ब्रायन लारा स्टेडियम, तारुबा, त्रिनिदाद येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजता खेळवला जाईल. आतापर्यंत दोघांमध्ये खेळल्या गेलेल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा वरचष्मा राहिला आहे. या विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले तर, वेस्ट इंडिजने त्यांचे पहिले 2 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंड संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. हा सामना हॉटस्टार ॲपवर थेट प्रक्षेपित केला जाईल आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचा आनंद घेता येईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)