IPL चा स्टार भारतीय क्रिकेटर Bipul Sharma ने केली निवृत्तीची घोषणा, देश सोडून अमेरिकेच्या संघात झाला सामील

2016 मध्ये आयपीएल-विजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघाचा सदस्य, बिपुल टी-20 लीगमध्ये पंजाब किंग्जकडूनही खेळला. आयपीएलच्या 33 सामन्यांमध्ये 17 विकेट घेणार्‍या बिपुलने 2016 च्या फायनलमध्ये एबी डिव्हिलियर्सची बहुमूल्य विकेट मिळवली होती.

माजी आयपीएल विजेता बिपुल शर्मा (Photo Credit: Instagram)

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात वरिष्ठ खेळाडूंपैकी एक बिपुल शर्माने (Bipul Sharma) भारतीय क्रिकेटमधून (Indian Cricket) निवृत्ती जाहीर केली आहे आणि आता तो USA कडून खेळेल. शर्मा यूएसएमध्ये खेळणार असल्याने बिपुल भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकणार नाही. बीसीसीआयच्या (BCCI) नियमानुसार, परदेशी लीगमध्ये भाग घेण्यासाठी खेळाडूला आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bipul Sharma (@bipulsharma30)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)