David Willey Retirement: इंग्लंडच्या डेव्हिड विलीने विश्वचषकादरम्यान केली निवृत्तीची घोषणा, सोशल मीडियावरद्वारे भावना केल्या व्यक्त
डेव्हिड विलीने (David Willey) बुधवारी (1 नोव्हेंबर) सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली आणि म्हटले की, भारतात खेळल्या जाणार्या एकदिवसीय विश्वचषकानंतर तो पुन्हा कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. डेव्हिड विलीने (David Willey) बुधवारी (1 नोव्हेंबर) सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे निवृत्तीची घोषणा केली आणि म्हटले की, भारतात खेळल्या जाणार्या एकदिवसीय विश्वचषकानंतर तो पुन्हा कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही. 'हा दिवस यावा असे मला कधीच वाटले नाही, लहानपणापासून माझे नेहमीच एकच स्वप्न होते - इंग्लंडसाठी क्रिकेट खेळण्याचे," विलीने X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. खूप विचार केल्यानंतर, "मला अत्यंत दुःखाने हे जाहीर करावे लागते की या विश्वचषकाच्या शेवटी, माझ्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे." (हे देखील वाचा: ICC Best fielding Impact: मिचेल सँटनर विराट कोहलीच्या पुढे, आयसीसीने दिला सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा दर्जा; पाहा रेंटिग)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)