IND W vs ENG W Test Series: भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा महिला संघ नवी मुंबईत दाखल, ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले स्वागत (Watch Video)
यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी खेळली जाणार असून, त्यासाठी पाहुणा संघ नवी मुंबईत दाखल झाला आहे. येथे पोहोचल्यावर इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाचे भव्य स्वागत करण्यात आले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ (India W vs England W) यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20 Series) संपली आहे. इंग्लंडने ही मालिका 2-1 ने जिंकली. मात्र, पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत शेवटचा सामना जिंकला. आता यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी खेळली जाणार असून, त्यासाठी पाहुणा संघ नवी मुंबईत दाखल झाला आहे. येथे पोहोचल्यावर इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाचे भव्य स्वागत करण्यात आले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू नवी मुंबईतील हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. यावेळी ढोल वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. भारतातील हे पारंपारिक स्वागत पाहून इंग्लंडच्या महिला संघाच्या खेळाडू खूप आनंदी दिसल्या आणि काही जण ढोलाच्या तालावर नाचतानाही दिसले. हा व्हिडिओ शेअर करताना इंग्लंड क्रिकेटने भारतातील या शानदार स्वागताचे कौतुक केले आहे. (हे देखील वाचा: ICC ने जाहीर केले U19 World Cup 2024 वेळापत्रक, टीम इंडिया पहिला सामना कधी खेळणार? जाणून घ्या तपशील वाचा)
पाहा व्हिडिओ