England Women vs Scotland Women, 17th Match Live Toss Update: स्कॉटलंडची कर्णधार कॅथरीन ब्राइसचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
उभय संघांमधील हा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंड संघाने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत.
England Women National Cricket Team vs Scotland Women National Cricket Team 17th Match 2024 ICC Women's T20 World Cup Live Toss Update: 2024 च्या आयसीसी महिला टी 20 विश्वचषकाचा 17 वा सामना आज म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे. स्कॉटलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरूद्ध इंग्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट (ENG vs SCO)संघामधील सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. इंग्लंड संघाने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत दोन सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये दोघांमध्ये विजयाची नोंद झाली आहे. अशा स्थितीत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी इंग्लंडचा संघ स्कॉटलंडला मोठ्या फरकाने पराभूत करण्याचा प्रयत्न करेल आणि टी-20 विश्वचषकात(2024 ICC Women’s T20 World Cup) तिसरा विजय नोंदवू इच्छितो. दुसरीकडे, स्कॉटलंड संघाने टी-20 विश्वचषकात आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना तिन्ही ठिकाणी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याशिवाय स्कॉटिश संघही उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशा स्थितीत स्कॉटलंड संघाला इंग्लंडविरुद्ध पहिला विजय नोंदवायचा आहे. दरम्यान, स्पर्धेच्या 17 व्या सामन्यात स्कॉटलंडची कर्णधार कॅथरीन ब्राइसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)