England ODI Squad Against Australia: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंडला मिळाला नवा कर्णधार, घेणार जोस बटलरची जागा; पाहा संघ
दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर असलेला नियमित कर्णधार जोस बटलर आता एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर आहे.
England National Cricket Team vs Australia National Cricket ODI Series: राष्ट्रीय क्रिकेट संघ (England National Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ (Australia National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील 2024 मधील तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना आज खेळवला जात आहे. या मालिकेत इंग्लंडच्या कर्णधारपदाची जबाबदारी फिट सॉल्ट सांभाळत आहे. पण नुकताच, इंग्लंड क्रिकेट संघाने एकदिवसीय संघाचाही कर्णधार बदलला आहे. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर असलेला नियमित कर्णधार जोस बटलर आता एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर आहे. बटलरच्या अनुपस्थितीत संघाने प्रथमच हॅरी ब्रूककडे वनडे संघाची कमान सोपवली आहे.
इंग्लंड एकदिवसीय संघ: हॅरी ब्रूक (कर्णधार), जोफ्रा आर्चर, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स, बेन डकेट, विल जॅक्स, लियाम लिव्हिंगस्टन, मॅथ्यू पॉट्स, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जेमी स्मिथ, ऑली स्टोन, रीस टोपली, जॉन टर्नर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)