AUS vs ENG, 17th Match Toss Update: इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकली, ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदांजीसाठी केले अमंत्रित

ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात ओमानचा 39 धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी स्कॉटलंडसोबत इंग्लंडचा पहिला सामना अनिर्णित राहिला. अशा परिस्थितीत हा सामना खूपच रोमांचक होणार आहे.

AUS vs ENG T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक 2024 चा 16 वा सामना आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात खेळला जात आहे. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला जात आहे. ब गटातील हा सामना आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी आतापर्यंत 1-1 सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात ओमानचा 39 धावांनी पराभव केला होता. त्याचवेळी स्कॉटलंडसोबत इंग्लंडचा पहिला सामना अनिर्णित राहिला. अशा परिस्थितीत हा सामना खूपच रोमांचक होणार आहे. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, विल जॅक्स, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now